पुणे, १४ एप्रिल २०२६ – प्रबुद्ध विचार मंच, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनी संयुक्त जयंती महोत्सव साजरा करत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले अशा थोर महापुरुषांना प्राईड वर्ल्ड सिटी मधील रहिवाशांनी मानवंदना दिली. प्रबोधनात्मक भाषणे, महिलांचा लक्षणीय सहभाग, लहान मुला-मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम व कलासादरीकरण, बाबासाहेबांचे अफाट पुस्तकप्रेम अधोरेखित करणारे भव्य पुस्तक प्रदर्शन, आणि सायंकाळी रोषणाईने सजलेल्या रथामधून महापुरुषांची भव्य मिरवणूक अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी परिपूर्ण संयुक्त जयंती महोत्सवामध्ये रहिवाशांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली.
मॅनहॅटन कम्युनिटी हॉल येथे सकाळी १० वाजता डॉ विशाल घोरपडे यांनी दीपप्रज्वलन करून पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन केले आणि सर्व रहिवाशांना प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आवाहन केले. प्रबोधनापासून, राजकारण, इतिहास, क्रीडा, आरोग्य अशा विविध विषयांवरील पुस्तक प्रदर्शनाला सायंकाळी ७ वाजेपर्यंत रहिवाशांनी भेट दिली.
लॉँग आयलँड कम्युनिटी हॉल येथे कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा नंदा सोनटक्के व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण होऊन करुणेचे प्रतीक असलेल्या बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर २ ते १८ वर्षे वयोगटापर्यंच्या मुला-मुलींनी चित्रकला, गायन, नृत्य, पियानो वादन, वक्तृत्व, सावित्रीबाई फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत लघुनाट्य अशा अनेक कला सादर केल्या. त्यानंतर मान्यवरांची प्रबोधनात्मक भाषणे झाली त्यामध्ये अश्विनी कापुरे (उपाध्यक्षा, कोटक बँक), राजनंदिनी भागवत (सहायक आयुक्त), हर्षल कोतले (उपायुक्त, जी.एस.टी), डॉ सुखदेवे (मा. व्यवस्थापक, आर.बी.आय), डॉ सोनिका कापुरे (वैद्यकीय अधिकारी, रुबी हॉल), डॉ सुरेश कठाणे, डॉ विशाल घोरपडे, डॉ स्मिता घोरपडे, डॉ अजय मोहोद, गौरव निकम (सामाजिक न्याय विभाग), संतोष जाधव, ॲडव्होकेट अतुल्य राठोड (चेअरमन, लॉँग आयलँड सोसायटी), आणि संजय पवार साहेब (सामाजिक कार्यकर्ते), विश्वास बाबरे (युवा व्याख्याते) यांनी आपले विचार मांडले. या सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने झाली आणि उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. प्रीती भालेराव आणि जयश्री आराख यांनी अप्रतिम सूत्रसंचालन केले.
सायंकाळी ७ वाजता प्राईड वर्ल्ड सेल्स ऑफिस समोरून आकर्षक रोषणाईने सुसज्ज अशा रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमा विराजमान करून मिरवणुकीची सुरुवात प्रतीक पाटील (प्राईड ग्रुप) यांच्या हस्ते झाली. मिरवणुकीमध्ये मा. महापौर, विद्यमान नगरसेवक नितीन आप्पा काळजे, नगरसेवक सचिन भाऊ तापकीर, नगरसेविका श्रुती ताई डोळस यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रबुद्ध विचार मंच चे कार्यकर्ते सुचित ओव्हाळ, अमरदीप कोतले, अक्षय कांबळे, शुभम रोकडे, वैभव पवार, रुपेश सोनटक्के, उशांत करमणकर, अभिलाष निकोसे, निखिल भालेराव, सुयोग हिरे, शैलेश सुरवाडे, पप्पू तिवडे, सतीश पडघणे, विश्वास बाबरे, स्मित पाईकराव, यश जाधव, प्रीती भालेराव, जयश्री आराख, राजनंदिनी भागवत-कोतले, स्मिता तांबे, किरण ओव्हाळ, वर्षा दवणे, विद्या धाकडे, प्रज्ञा जगताप-कांबळे, अश्विनी रोकडे, पूनम सुरवाडे, स्वाती तिवडे, डॉ स्मिता घोरपडे, ज्योती जाधव, प्रज्ञा जाधव, शितल भैरमदगीकर, विशाखा कोतले, विजया बच्छाव आणि इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

More Stories
Pune: उद्याचा पाणी बंद रद्द, शहरात नियमित पाणी येणार
एकाग्र मनाने तानपुऱ्याच्या षड्जामध्ये आपला सूर मिसळणे हा प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार – ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर
पुणे फोटोग्राफर्स असोसिएशनचा ‘फोटो फेअर’ उत्साहात संपन्न