पुणे, 18 एप्रिल 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रिभव सारोहा, जपानच्या माओ ताझुरू यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या रिभव सारोहा याने पाचव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या हीटन पॅनचा 6-3, 7-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. चुरशीच्या लढतीत जपानच्या माओ ताझुरू याने भारताच्या सातव्या मानांकित तनुष घिल्डयालचा 4-6, 6-1, 10-6 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
आठव्या मानांकित आदित्य मोर याने यशविन दहियाचा टायब्रेकमध्ये 7-6(8), 6-1 असा तर, दुसऱ्या मानांकित प्रणील शर्मा याने ओम वर्माचा 6-3, 6-2 असा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत धडक मारली. तिसऱ्या मानांकित देव पटेल याने स्वराज ढमढेरेवर 7-6(2), 6-2 असा विजय मिळवला. वरद उंद्रे याने श्रीकर दोनीला 7-6(2), 6-3 असे नमविले.
निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
हर अबीर सेखों(ऑस्ट्रेलिया)[1]वि.वि.प्रज्ञेश शेळके(भारत) 6-0, 6-3;
विश्वजीत सणस (भारत)वि.वि.सूर्या काकडे (भारत)6-4, 3-6, 10-5;
कुरनोसुके सुझुकी(जपान) वि.वि.शरण सोमासी (भारत) 6-4, 6-3;
आदित्य मोर [8](भारत)वि.वि.यशविन दहिया (भारत)7-6(8), 6-1;
प्रणील शर्मा [2](भारत)वि.वि.ओम वर्मा (भारत)6-3, 6-2;
देव पटेल[3] (भारत)वि.वि. स्वराज ढमढेरे (भारत)7-6(2), 6-2;
ओम पटेल (भारत)वि.वि.आरव चावला (भारत)4-6, 7-6(5), 10-8;
अयान शेट्टी(भारत)वि.वि.विवान बिदासरिया (भारत) 6-3, 6-4;
रिभव सारोहा (भारत)वि.वि.हीटन पॅन[5](ऑस्ट्रेलिया) 6-3, 7-5;
पंशुल उबोवेजा(भारत)वि.वि.अद्वित तिवारी (भारत)6-1, 6-0;
ईटा सुझुकी(जपान) वि.वि.ओम ठक्कर (भारत)6-0, 6-0;
सेहुन पार्क[4](ऑस्ट्रेलिया)वि.वि.विरेन सूर्यवंशी (भारत) 6-0, 2-6, 10-6;
वरद उंद्रे (भारत)वि.वि.श्रीकर दोनी (भारत)7-6(2), 6-3;
माओ ताझुरू(जपान)वि.वि.तनुष घिल्डयाल (भारत)[7] 4-6, 6-1, 10-6;
मुली:
तमन्ना नायर (भारत)वि.वि.अरुणिमा रॉय (भारत)6-2, 6-1;
सविता भुवनेश्वरन (भारत)वि.वि.रितू ग्यान (भारत)6-3, 6-1;
नानायो वाडा[7](जपान)वि.वि.मारिया पटेल (भारत)4-6, 6-3, 10-7;
तनुश्री सतेश (भारत)वि.वि.सारा फेंगसे (भारत)6-1, 6-1;
पवित्र कौर पानसी [3](ऑस्ट्रेलिया)वि.वि.सन्मिथा हरिणी (भारत)6-1, 6-4;
इशल पठाण (भारत)वि.वि.सान्वी राजू (भारत)2-6, 6-2, 12-10.

More Stories
32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत जीओजी एफसी, सीएमएस फाल्कन्स, थंडरकॅट्ज एफसी यांचे सनसनाटी विजय
एमएसएलटीए व डेक्कन जिमखानाच्या वतीने प्रतिष्ठीत बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात आयोजन