पुणे, 20 एप्रिल 2026: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात दिया रमेश, जेन्सी कानबर या भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत मुलींच्या गटात कझाकस्तानच्या इवा कोरीशेवा हिने पाचव्या मानांकित मिकू किटाओकाचा 6-2, 7-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. सातव्या मानांकित भारताच्या दिया रमेश याने ऑस्ट्रेलियाच्या एमिली चेनचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(0) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. भारताच्या जेन्सी कानबर हिने कझाकस्तानच्या सतीमा तोरेगेनचा 6-4, 6-2 असा पराभव केला.
मुलांच्या गटात जपानच्या रिकू नाकामोटो याने भारताच्या सहाव्या मानांकित आराध्य क्षितिजचा 6-1, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. जपानच्या इतो कोमाडा याने भारताच्या मनन अग्रवालचा 6-2, 3-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला. सातव्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या यमराली इब्राईमी याने भारताच्या नील केळकरचा 6-0, 6-3 असा पराभव करून विजयी सलामी दिली. याआधी स्पर्धेचे उदघाटन एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहीर केळकर, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव गिरीश इनामदार आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव डॉ. विक्रांत साने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
ह्यु कावनिशी[1](जपान) वि.वि.ॲलेक्स लॅप हँग हुई(हाँगकाँग)6-4, 6-2;
कोडी ऍटकिन्सन(न्यूझीलंड) वि.वि.रॉजर कोईके(जपान) 3-6, 7-6(0), 6-0;
जुनसेओ जंग(कोरिया) वि.वि.इथन डोमिंगो(ऑस्ट्रेलिया) 6-0, 6-0;
रिकू नाकामोटो(जपान)वि.वि.आराध्य क्षितिज (भारत)[6] 6-1, 6-3;
निकोलस बेकर[8](ऑस्ट्रेलिया) वि.वि.कोयू यानागी(जपान)7-6(5), 6-2;
इतो कोमाडा(जपान) वि.वि.मनन अग्रवाल(भारत) 6-2, 3-6, 6-4;
यमराली इब्राईमी[7](ऑस्ट्रेलिया) वि.वि.नील केळकर(भारत)6-0, 6-3;
सेउंग-मिन ओह(कोरिया) वि.वि. केनसुके कोबायाशी(जपान)6-0, 6-3;
जेक डेम्बो[4](ऑस्ट्रेलिया) वि.वि.आदित्य मोर(भारत) 6-3, 6-3;
मुली
माई सासाकी(जपान)वि.वि.येर्केझन झानतायेवा(कझाकस्तान)6-2, 7-5;
लिसा अनझाई(जपान)वि.वि.दानिया डॅनिएला हझली(मलेशिया)6-3, 6-3;
मियु निशिवाकी(जपान) वि.वि.एंजल वारंग(ऑस्ट्रेलिया)6-1, 7-5;
इवा कोरीशेवा(कझाकस्तान) वि.वि.मिकू किटाओका[5](जपान) 6-2, 7-5;
जेन्सी कानबर(भारत) वि.वि.सतीमा तोरेगेन(कझाकस्तान) 6-4, 6-2;
सियोन सिम[4](कोरिया) वि.वि.प्रिशा शिंदे(भारत)6-2, 7-5;
रियो योशिदा[1](जपान) वि.वि.ऐश्वर्या जाधव(भारत) 6-1, 6-2;
रिहो गोटो(जपान) वि.वि.जन्नत चिरिपाल(भारत) 6-0, 6-1;
दिया रमेश[7](भारत) वि.वि.एमिली चेन(ऑस्ट्रेलिया)6-1, 7-6(0).
दुहेरी: पहिली फेरी:
रिकू नाकामोटो/ योशिहिरो साकुराई(जपान) वि.वि.देव पटेल/पंशुल उबोवेजा(भारत) 5-7, 6-4, 10-5;
दा कोस्टा, राफालेंटिनो अली(इंडोनेशिया)/राफेल सेवेल(ऑस्ट्रेलिया) वि.वि. चो, मिन ह्युक/किम ताए वू[4] 6-3, 7-5;
मुली:
सविता भुवनेश्वरन / मिसाकी यामागीशी (इंडिया) बीटी दीया अग्रवाल / तनिष्का टी(इंड) 6-0, 6-2.

More Stories
एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रिभव सारोहा, माओ ताझुरू यांचे विजय
32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत जीओजी एफसी, सीएमएस फाल्कन्स, थंडरकॅट्ज एफसी यांचे सनसनाटी विजय