पिंपरी, दि. २० एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनिहाय करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात धडक निष्कासन कारवाईचा सविस्तर आढावा आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई अधिक सक्त करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, अतिक्रमण विभागाचे मुख्यालय उपायुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अजिंक्य येळे, तानाजी नरळे, किशोर ननवरे, पूजा दुधनाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठकीमध्ये अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण कारवाई, नाल्यावरील अतिक्रमण निर्मूलनचा सविस्तर आढावा घेतला. तसेच अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात प्रास्तावित कारवाईची माहिती देखील आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी घेतली.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा नियमित आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करावी. जे फेरीवाले रस्त्यावर स्टॉल लावतात, त्यांच्यावर देखील कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

More Stories
पवना धरण ९९ टक्के भरले; विसर्ग वाढणार, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – महापालिकेचे आवाहन
NEET 2026 मध्ये अखिल भारतीय स्तरावर 498 वा क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कन्या अतुल्या डोंगरे यांचा महापौरांकडून गौरव..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी