पुणे, 23 एप्रिल 2026: पुना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत श्रीनिवास चाफळकर 1-6 व 10धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पँथर्स संघाने जेट्स संघाचा 5 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
पुना क्लब येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना जेट्स संघाने 6षटकात 5बाद 50धावा केल्या. यात चिराग लुल्ला 20 धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी खेळी करू शकला नाही. पँथर्स संघाकडून प्रथमेश देशमुख(2-3), कौशल अन्वलीकर(1-3), श्रीनिवास चाफळकर(1-6) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान पँथर्स संघाने 4.4 षटकात 3बाद 53धावा करून पूर्ण केले. यात अर्जुन किर्तने नाबाद 17, गौरव चाफळकर नाबाद 13, श्रीनिवास चाफळकर 10 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर श्रीनिवास चाफळकर ठरला.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन पूना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहीर केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पूना क्लबचे क्रीडा विभागाचे सचिव तुषार आसवाणी आदी उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी:
जेट्स: 6षटकात 5बाद 50धावा(चिराग लुल्ला 20(9,3×4,1×6), प्रथमेश देशमुख 2-3, कौशल आना 1-3, श्रीनिवास चाफळकर 1-6) पराभूत वि. पँथर्स: 4.4 षटकात 3बाद 53धावा(अर्जुन किर्तने नाबाद 17, गौरव चाफळकर नाबाद 13, श्रीनिवास चाफळकर 10, निव नवानी 1-17); सामनावीर – श्रीनिवास चाफळकर. .

More Stories
पाचव्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत गोल डिगर्स एफसी संघाची विजयी आगेकूच
व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत केतकी थिटे, आध्या शाइन, नाझरीन फरझा, कनिष्क बिजार्निया यांची आगेकूच
व्ही.व्ही. नातू स्मृती योनेक्स-सनराईज अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत श्रेया भोसले, सारा साळुंके, तामिळनाडूच्या हरिणी राजा यांचे विजय