पुणे, 30 एप्रिल 2026: पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या पीवायसी चॅलेंजर करंडक खुल्या टी20 क्रिकेट स्पर्धेत सहा संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर 1 मे ते 12 मे 2026 या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धा संचालक प्रसाद शिंदे यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सहभागी संघांमध्ये पीवायसी येथे प्रशिक्षण घेणाऱ्या 19 वर्षाखालील व खुल्या गटातील क्रिकेटपटूचा समावेश आहे. “पीवायसी चॅलेंजर करंडक स्पर्धेच्या माध्यमातून युवा आणि अनुभवी खेळाडूंना एकाच व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळत आहे. या स्पर्धेमुळे खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याबरोबरच पुढील स्तरावर जाण्यासाठीही प्रेरणा मिळेल,”.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. तसेच, स्पर्धा व्हाईट बॉल व रंगीत कपड्यांमध्ये होणार आहे. स्पर्धेत पाथफाइंडर्स इलेव्हन, सिंहगड स्ट्रायकर्स, राजगड रॉयल्स, चिलीज टायटन्स, पुरंदर पँथर्स, पुणेरी पेशवा हे संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत दिएगो ज्युनियर एफसी, संगम स्पोर्ट्स क्लब, इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब, परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब संघांचे विजय
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स संघाला विजेतेपद
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स व सेलर्स यांच्यात अंतिम लढत