पुणे, 29 एप्रिल 2026: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत दिएगो ज्युनियर एफसी, संगम स्पोर्ट्स क्लब, इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब, परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा संघर्षपूर्ण पराभव केला.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब संघाने सीएमएस फाल्कन्सचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात 8व्या मिनिटाला इंद्रायणी संघाच्या जीवनसिंग रावतने सोलो करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या सीएमएस फाल्कन्सच्या आघाडीच्या फळीने जोरदार प्रतिक्रमण केले. अखेर 36व्या मिनिटाला अनुप नायरने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. पूर्वार्धात हि बरोबरी कायम होती.
उत्तरार्धात इंद्रायणी संघाच्या खेळाडूंनी वरचढ खेळ केला. 56व्या मिनिटाला मार्कंड हरदेवने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. सीएमएस फाल्कन्सच्या मध्यरक्षकांनी जोरदार चढाया करत आक्रमण केले, पण इंद्रायणी संघाच्या बचावफळीने त्यांचे आक्रमण परतवून लावले व सामन्यात आपली आघाडी कायम ठेवत सीएमएस फाल्कन्सवर 2-1 असा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात धीरज यदुल्ला(25मि.),समर्थ जाधव(75मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब संघाने संगम स्पोर्ट्स क्लबचा 2-1 असा कडवा प्रतिकार केला. पराभूत संघाकडून हर्ष उतेकर(38मि.)याने एक गोल केला. अन्य लढतीत परम राठोड(3,17,62मि.) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर दिएगो ज्युनियर एफसी संघाने चेतक एफसी संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. चुरशीच्या लढतीत जीओजी एफसी संघाने आयफा संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. जीओजी एफसी संघाकडून प्रकाश थोरात(24,50मि.) याने दोन गोल, श्रीकांत मोलांगिरी(66मि.) याने एक गोल केला. नोखफोआ कोन्याक(9,56मि.) याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर संगम स्पोर्ट्स क्लब संघाने रिअल पुणे युनायटेड एफसीवर 3-0 सहज विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब: 2(जीवनसिंग रावत 8 मि., मार्कंड हरदेव 56 मि.) वि.वि.सीएमएस फाल्कन्स: 1(अनुप नायर 36मि.);
परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब: 2(धीरज यदुल्ला 25मि., समर्थ जाधव 75मि.) वि.वि. संगम स्पोर्ट्स क्लब: 1(हर्ष उतेकर 38मि.);
जीओजी एफसी: 3 (प्रकाश थोरात 24,50 मि., श्रीकांत मोलांगिरी 66 मि.) वि.वि.आयफा: 2 (अबुबकर मणियार 11 मि., जस्सिम नारू 36 मि);
दिएगो ज्युनियर एफसी: 5(परम राठोड 3,17,62 मि., चल्ला जॉन 46 मि., अक्षय सुर्वे 52 मि.) वि.वि.चेतक एफसी: 0;
इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब: 3 (आयुष दीपक 10 मि., विवेक सोनुने 23 मि., शुभम पोटघन 69 मि.)वि.वि.फातिमा इलेव्हन: 0;
संगम स्पोर्ट्स क्लब: 3 (नोखफोआ कोन्याक 9, 56 मि., हर्ष उतेकर 48 मि.)वि.वि.रिअल पुणे युनायटेड एफसी: 0.

More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स संघाला विजेतेपद
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना सुपर क्रिकेट लीग स्पर्धेत पँथर्स व सेलर्स यांच्यात अंतिम लढत
32व्या वरिष्ठ राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 60 व 70 वर्षांवरील पुरुष गटात महाराष्ट्र संघाला विजेतेपद