पुणे, दि.29 मे 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब संघाने सलग तिसऱ्या विजयासह आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.
डिझायर स्पोर्ट्स मैदानावरील लढतीत ऋग्वेद चौधरी(4-7) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा 9 गडी राखून पराभव करत आगेकूच कायम राखली. शिंदे हायस्कुल मैदानावरील चुरशीच्या लढतीत प्रणव शिंदे(3-47 व 26धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघावर 1 गडी राखून निसटता विजय मिळवला.
पीवायसी मैदानावरील लढतीत यश अधिकारी 4-48) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी संघाने झोराष्ट्रीयन्स संघाचा 45धावांनी पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. हांडेवाडी येथील सनी इलेव्हन क्रिकेट मैदानावरील लढतीत अद्वैत डेरे 4-13) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर ट्रिनिटी संघाने केडन्स संघाचा 3 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
डिझायर स्पोर्ट्स मैदान:
युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 18.4 षटकात सर्वबाद 77धावा(भावेश माखिजा 24, प्रणव ठोंगे 17,ऋग्वेद चौधरी 4-7, आर्यन हिंगणे 2-24, साद पठाण 2-25) पराभुत वि.पूना क्लब: 11.3 षटकात 1बाद 79धावा(अनिकेत शिंदे 53(29,9×4,2×6), सिद्धांत बाफना 15, ओंकार वाघ 1-12); सामनावीर-ऋग्वेद चौधरी; पूना क्लब 9 गडी राखून विजयी;
शिंदे हायस्कूल मैदान :
क्लब ऑफ महाराष्ट्र : 33.2 षटकात सर्वबाद 168धावा(सय्योग भोसले 46(65,6×4,1×6), सुमित कोकरे 37(17,7×4,1×6), प्रद्युम्न धोंड 44(55,6×4,1×6), प्रणव शिंदे 3-47, यशराज शिंदे 2-16, ईशान कुबडे 1-1) पराभूत वि.केदार जाधव क्रिकेट अकादमी: 35.5 षटकात 9बाद 169धावा(अथर्व शेळके 54(32,6×4,4×6), प्रणव शिंदे 26, वंश सालगे 16, यशराज शिंदे नाबाद 16, ऋतुराज शेवाळे 14, इशान कुबडे 10, रणवीर पवार 3-45, श्रीनिवास गाडे 2-24);सामनावीर-प्रणव शिंदे; केजेसीए 1 गडी राखून विजयी;
पीवायसी मैदान:
पीवायसी: 43.3 षटकात सर्वबाद 246धावा(अथर्व वैद्य 76(99,6×4,1×6), श्लोक जोशी 54(48,4×4,1×6), प्रद्युम्न कोळी 31, ओम सानप 10, जय दानवले 3-44, तनुज काळे 3-44, ओंकार मोगल 2-28)वि.वि.झोराष्ट्रीयन्स: 41.2 षटकात सर्वबाद 201धावा(प्रेमराज जगदाळे 85(90,10×4,4×6), वरद माहोरे 31, एरॉन बिनू नाबाद 31, पियुष धेंडुळे 16, यश अधिकारी 4-48, शिवम दिवेकर 2-33, रुहुल्ला नदाफ 1-23); सामनावीर – यश अधिकारी; पीवायसी 45धावांनी विजयी;
सनी इलेव्हन क्रिकेट मैदान, हांडेवाडी:
केडन्स: 31.4 षटकात सर्वबाद 106धावा(अर्णव पाटील 20, धीरज ढेरे 20, प्रसाद आंबळे 15, प्रणित जगताप 18, अद्वैत डेरे 4-13, वेदांत सुंताले 2-9, रॉनी पोतदार 2-28) पराभूत वि.ट्रिनिटी: 32षटकात 7बाद 109धावा(अमन सिंग 32(33,4×4,2×6), प्रतीक कडलक 18, अद्विक तिवारी 13, प्रेम इघे 13, संग्राम कांबळे नाबाद 10, अर्णव अग्रवाल 5-22, प्रसाद आंबळे 1-7); सामनावीर-अद्वैत डेरे; ट्रिनिटी 3 गडी राखून विजयी;

More Stories
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत देशभरांतून 150हून अधिक खेळाडू सहभागी
पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण, सई कुलकर्णी यांना विजेतेपद
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए), पूना क्लब संघांची विजयी आगेकूच