June 4, 2026

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए) संघांची विजयाची हॅट्ट्रिक

पुणे, दि.30 मे 2026: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी संघाने सलग तिसऱ्या विजयासह आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.

सिंहगड क्रिकेट अकादमी मैदानावरील लढतीत कौशिक सूर्यवंशी(111धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीसह आयुष रक्ताडे(84धावा व 2-54) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए) संघाने स्टार्स क्रिकेट क्लबवर 232 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

आर्यन्स क्रिकेट मैदानावरील लढतीत आयुश बकरोला(4-39) याने केलेल्या शिस्तबद्व गोलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने आर्यन्स क्रिकेट अकादमीचा 5 गडी राखून पराभव दुसऱ्या विजयाची नोंद केली. शिंदे हायस्कूल मैदानावरील लढतीत यशराज शिंदे(3-32) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर केदार जाधव क्रिकेट अकादमी(केजेसीए) संघाने झोराष्ट्रीयन्स संघाचा 14 धावांनी पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:
आर्यन्स क्रिकेट मैदान:
आर्यन्स क्रिकेट अकादमी: 41.1 षटकात सर्वबाद 235 धावा(विरांश वर्मा 109(96,11×4,4×6), आर्यन घोडके 23, साई बोऱ्हाडे 39(59,4×4), आयुश बकरोला 4-39, सार्थक बिराजदार 2-42, आर्य कुमावत 2-28) पराभूत वि.डेक्कन जिमखाना: 42.1 षटकात 5बाद 238धावा(सारस जोगी 78(67,7×4,4×6), आयुष उभे 54(76,7×4), आलाप पंगू 24, आर्या कुमावत नाबाद 22, सार्थक बिराजदार 19, पृथ्वीराज चव्हाण 2-30, शिवेणे भारद्वाज 1-2-4); सामनावीर-आयुश बकरोला; डेक्कन जिमखाना 5 गडी राखून विजयी;

सिंहगड क्रिकेट मैदान:
पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए): 45 षटकात 6बाद 425धावा(कौशिक सूर्यवंशी 111(104,14×4,2×6), आयुष रक्ताडे 84(37,8×4,7×6), राघव नाईक 53(51,8×4), इंद्रजीत शिंदे 41(17,2×4,5×6), राम राठोड 33, अनिश जोशी 32, सार्थक छबिलवाड नाबाद 27, पार्थ सुर्डीकर 2-47, आयुष आमराळे 2-68) वि.वि.स्टार्स क्रिकेट क्लब: 44.4 षटकात सर्वबाद 193 धावा(श्रीयश बिहाडे नाबाद 76(134,10×4), अनिश भोसले 28,तन्मय थोरात 14, पार्थ सुर्डीकर 14, सार्थक छबिलवाड 3-38, सूर्या निकम 3-21, आयुष रक्ताडे 2-54, व्यंकटेश बेहेरे 2-14); सामनावीर-आयुष रक्ताडे; पीबीसीए 232 धावांनी विजयी;

शिंदे हायस्कूल मैदान:
केदार जाधव क्रिकेट अकादमी (केजेसीए) : 32.5 षटकात सर्वबाद 152धावा(ऋतुराज शेवाळे 37, चिन्मय भास्कर 29, अथर्व शेळके 19, प्रणव शिंदे 15, जय दानवले 2-26, एरॉन बिनू 2-15, ओंकार मोगल 2-30, प्रेमराज जगदाळे 2-33, तनुज काळे 2-30) वि.वि.झोराष्ट्रीयन्स: 30.5षटकात सर्वबाद 138धावा(ओंकार मोगल 45(51,4×4,2×6), वरद माहोरे 15, एरॉन बिनु 34, यशराज शिंदे 3-32, वंश सलागे 3-36, प्रणव शिंदे 2-27); सामनावीर – यशराज शिंदे.

You may have missed