पुणे, दि. 22/02/2023- गिऱ्हाईकाच्या वादातून दोन गटाने शहरातील नामांकित फर्ग्युसन रस्ता परिसरात गोंधळ घालत शांततेचा भंग केला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. ही घटना २१ फेब्रुवारीला दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.
महेश मारुती नायक, वय २४ रा आणाभाऊ साठे चौक, वारजे, सुरज श्रीकांत कालगुडे वय २१ रा जनवाडी अमित निलेश देशपांडे वय २६ रा. ५५ नारायण पेठ विशाल नरेश उकिर्डे वय २१ रा.तळजाई रोड अशी अटक केलेल्याची नावे आहेत. पोलीस अमलदार तुषार आल्हाट यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फर्ग्युसन रस्ता परिसरात आरोपीची विविध वस्तू विक्रीची दुकाने आहेत. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून ग्राहकामुळे वाद सुरू आहेत. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पुन्हा ग्राहक दुकानात येण्यावर त्यांच्यात वादावादी झाली. त्या रागातून दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण करीत शांततेचा भंग केला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत.

More Stories
‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनातून युवाशक्तीने चेतवली देशभक्तीची ज्योत
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी सीओईपीमध्ये एबीव्हीपी-काँग्रेसमध्ये राडा
सूसमधील कचरा प्रकल्पाचे स्थलांतर नाहीच, प्रशासनाची भूमिका