पुणे, दि.१९ : कोंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु असल्यामुळे शितल पेट्रोल पंप चौकाकडून ज्योती हॉटेल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक १० जूनपर्यंत बंद करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पर्यायी मार्ग म्हणून वेलकम हॉल जंक्शन, मेफेअर सोसायटी जंक्शनमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप अशी एकेरी वाहतूक सुरु राहणार आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

More Stories
पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून : विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना आनंद घेता येणार
Pune: फेरीवाल्यांना नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ
भीम फेस्टिवल २०२६ : बावधनमध्ये उत्साहात साजरी आंबेडकर जयंती