शुक्रवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता व्हीनस आर्ट फेस्टचे उद्घाटन सुप्रसिद्ध पेपर मॅशे कलाकार भारती पित्रे व उद्योजक अजय पित्रे यांच्या हस्ते होईल. सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे हे देखील या वेळी उपस्थित असतील. उद्घाटनानंतर प्रमोद कांबळे व्यक्तिचित्र या चित्रकलेतील प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. शिवाय पु ल देशपांडे यांची सही असलेल्या १९१९ या नव्या पेनच्या मॉडेलचे अनावरण यावेळी होईल.
पुण्यासारख्या शहरात कलाकार, कलाप्रेमी, कला शाखेचे विद्यार्थी आदींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच यासंबंधीची रेखाटने, प्रात्यक्षिके यांचे आयोजन करीत एक संवाद प्रास्थापित व्हावा या उद्देशाने २०१३ सालापासून सदर कलामहोत्वाचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील कलाप्रेमींचे हक्काचे ठिकाण असलेले व्हीनस ट्रेडर्स हे येत्या १० जून रोजी ५० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना यावर्षीचा हा महोत्सव खास असल्याचे सुरेंद्र करमचंदानी यांनी आवर्जून सांगितले. महोत्सवाच्या तीनही दिवशी भगवद्गीता आणि वाल्मिकी रामायण हे ग्रंथ अनोख्या पुस्तक संचाच्या स्वरूपात उपस्थितांना पाहता येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. याबरोबरच रविवार दि ११ जून रोजी चिंटूचे निर्माते असलेले चारुहास पंडित हे चिंटूच्या मॅस्कॉट सोबत उपस्थितांना चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखवतील. हे प्रात्यक्षिक विनामूल्य असेल.

More Stories
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी