पुणे, २०/०९/२०२३: येरवडा प्रादेशिक मनाेरुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेऊन आत्मह्तया केल्याची घटना उघडकीस आली.सूरज राजेंद्र कांबळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या मनोरुग्णाचे नाव आहे. कांबळे मानसिक विकाराने ग्रस्त होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याला येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सूरजने पँट फाडली. पँटचा दोराप्रमाणे वापर केला. दोर खिडकीच्या गजाला बांधला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.
या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासाने पोलिसांना दिली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी येरवडा येथील मनोरुग्णालयात मनोरुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

More Stories
डीजे बंदीवरून गणेश मंडळांचा गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची नमती भूमिका!
पश्चिम पुण्यासह शहराच्या विविध भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद
४० शाळांमधील ६३० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रतिकृती तयार करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली