October 16, 2025

अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य….

पुणे, १०/०२/२०२५: अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर आत्ता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडिओ समोर आलं आहे ज्यात ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात अस म्हटलं आहे.यावर आत्ता आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर आत्ता पुन्हा त्यांचं एक व्हिडिओ समोर आलं आहे ज्यात त्यांनी भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात अस त्यांनी म्हटल आहे.

यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात आक्रमक झाले असून ते म्हणाले की हे विधान अत्यंत निषेधार्थ विधान केलं आहे, परंतु राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की जे वेद आहेत त्याच्याबद्दल डॉ बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये, राज्य सरकारने तात्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई सरकारने करावी, आणि राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा आम्ही देत आहोत.अस यावेळी खरात म्हणाले.

याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकर म्हणाले की माझ्या एका २३ नोव्हेंबरच्या ब्रॉडकास्ट मधील दोन वाक्य काढून मध्यंतरी प्रचंड गदारोळ माजला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबत बोलत असताना माझ्या कडून एक चुकीचं वाक्य बोललं गेलं होत.आणि त्याबाबत मी जाहीर माफी देखील मागितली होती.आज एक नवीन विषय समोर आलं आहे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देखील मी जे काही बोललो त्यातील देखील दोन वाक्य काढण्यात आली आणि व्हायरल केली गेली.४० वर्ष जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक थोर पुरुष असतील यांच्यावर जगभर मी व्याख्यान दिले आणि त्यांचं आदर्श घेऊनच मी पुढे गेलो आहे.जर कोणाला वाटत असेल तर आत्ता देखील जाहीर माफी मागतो अस यावेळी राहुल सोलापूरकर म्हणाले.

You may have missed