March 24, 2025

पुणे: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण

पुणे, १०/०२/२०२५: राज्याचे माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मोठ्या मुलांचं आज दुपारच्या सुमारास अपहरण झालं असून याबाबत खुद्द माजी मंत्री तान्हाजी सावंत यांनी पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून त्यांच्या मुलाचं तापस सुरू आहे.

ऋशिराज सावंत असं अपहरण झालेल्या माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं नाव आहे.

याबाबत सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले की आज चार वाजल्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रुमला एक माहिती मिळाली जी माजी मंत्री तान्हाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण कोणीतरी केलं आहे.ही माहिती मिळताच सर्व टीम ही ॲक्टीव्ह झाली आहे.तसेच त्यांची माहिती सर्व ठिकाणी देण्यात आली आहे.ऋशिराज सावंत हे पुणे विमानतळावरून फ्लाईट ने गेले आहे.फ्लाईट कोणत्या दिशेने जात आहे याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.आणि ऋशिराज सावंत यांना परत आणण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.याबाबत सिंहगड पोलीस स्टेशन येथे अपहरणाची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.आणि क्राईम ब्रांच येथे याच तपास देण्यात आलं आहे.आणि त्यांच्याकडून तपास देखील सुरू झालं आहे.

याबाबत माजी मंत्री तान्हाजी सावंत म्हणाले की बेपत्ता तसेच किडनॅपिंग अस काहीच नाही ते त्याचे दोन्ही मित्र आहे.यात नवीन काहीच नाही.माझ्या घरात अशी न सांगता जाण्याची कुठलीही पद्धत नाही.कुठे जरी जायचं असेल तर मला नेहेमी फोन करून सांगत असतो.त्याने त्याची गाडी न वापरता दुसऱ्याचीच गाडी वापरली आहे.त्यामुळे की खबरदारी म्हणून तक्रार दिली आहे.आमच्या कुटुंबात दिवसातून कमीत कमी १५ वेळा आमच्यात बोलणं होत असतो.ऋशिराज याच कोणतंही फोन न येता तो एअरपोर्ट येथे का गेला म्हणून मी तात्काळ पोलिसांनी माहिती दिली.मी जेव्हा आमच्या कॉलेजच्या कॅम्पस मध्ये आलो तेव्हा मला त्याच्या सोबत असलेल्या ड्रायव्हर ने माहिती दिली ऋशिराज हा त्याच्या दोन मित्रांच्या बरोबर गेला आणि मित्राच्या गाडीत गेल्याने मी खबरदारी म्हणून तक्रार दिली असल्याचं यावेळी तान्हाजी सावंत यांनी सांगितल.