पुणे, २५ मार्च २०२५ ः नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) राजाराम पूल ते धायरी या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. एक एप्रिलपासून हा उड्डाणपूल खुला होईल असे सांगितले जात होते. पण आता अजून एक महिना लागणार आहे.
सिंहगड रस्त्यावरून प्रवास करताना नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल ते धायरी या मार्गावर सप्टेंबर २०२१ मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू केले. महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून डिसेंबर २०२५ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. संबंधित काम गतीने करण्यात येत आहे. आता पुलाचे काम ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे. विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख म्हणाले, “पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता रंगरंगोटी, पथदिवे व दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यात हे काम पूर्ण होईल.’

More Stories
दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त