October 15, 2025

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात डिजिटल पुरावे आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 विषयावर एक दिवसीय परिसंवाद संपन्न

पुणे: दि. 15 मार्च 2025 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पुरावे आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019′ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय अॅड. अशोक पलांडे आणि प्राचार्या डॉ. सुनीता आढाव यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व स्वागतपर भाषणाने झाली. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संतोष काकडे, तर मान्यवर अतिथी म्हणून सौ. प्रणाली सावंत उपस्थित होत्या. परिसंवादात डॉ संतोष काकडे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व आणि डिजिटल पुराव्यांचे योगदान स्पष्ट केले. तसेच, विविध तज्ज्ञांनी तांत्रिक बाबीवर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम 4 तांत्रिक सत्रात पार पडला ज्यामध्ये सौ. प्रणाली सावंत ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे सिंहावलोकन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्याच बरोबर, श्री. शरद मडके यांनी ग्राहक आयोगाचे प्रभावी कार्य व श्री. उमेश जावळीकर यांनी डिजिटल अर्थव्यवस्था आणि ग्राहक संरक्षण कायदा व शेवटच्या सत्रात प्रा. डॉ. प्रकाश चौधरी यांनी ग्राहक न्याय अपेक्षा आणि वास्तव पाबद्दल आपले विचार मांडले

कार्यक्रमाचा समारोप श्री. श्रीकांत जोशी यांनी केला, तसेच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सहाय्यक प्राध्यापिका अनुजा शर्मा यांनी समर्थपणे पार पाडती. व सहाय्यक प्राध्यापक सुमित टाक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅड अशोक पालांडे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुनीता यांनी विशेष परिश्रम घेतले. या परिसंवादाला कायदा अभ्यासक, विद्यार्थी आणि ग्राहक हक्क कार्यकत्र्यांची मोठी उपस्थिती लाभली. डिजिटल पुरावे ग्राहक संरक्षणासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, यावर सखोल चर्चा झाली.