पुणे, १५ मार्च २०२५ ः औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची, आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर संभाजीनगर येथील ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मोर्चे काढेल, आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करून कारसेवा करून ती कबर उध्वस्त करेल. अशी मागणी विश्र्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी विश्र्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे उपस्थित होते. ‘क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव’ आंदोलन पूर्ण महारष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार व जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर होणार आहे. तसेच पुण्यात हे आंदोलन येत्या सोमवारी (ता. १७) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११.३० वाजता केले जाणार असून मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, “आपले सपूर्ण आयुष्य दगाबाजी, विश्वासघात व हिंदू द्वेषात घालविणारा , आपल्या भावांचा खून करणारा तसेच काशी विश्वनाथ, मथुरा, सोमनाथ मंदिरे फोडणारा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे ही कबर हटवली पाहिजे.”
औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरिया कायद्यानुसार वागत आहेत. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतूनच प्रेरणा मिळते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मारेकऱ्याची कबर जतन करण्याची आवश्यकता नाही. असे यावेळी नितीन महाजन यांनी नमूद केले.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी