पुणे, १७/०८/२०२४: भारत देश हा कधीच राष्ट्र्वादाच्या आहारी गेला नाही कारण हा देश प्रेमाच्या आधारे उभारलेला आहे. इथली भाषा प्रेमाची आहे व ती संविधानाने शिकवली आहे. हा प्रेमाचा वारसा वारकरी परंपरा, कबीर, महामानवांचे विचार, जनचळवळी, स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्याने शिकवला आहे. ज्याचे प्रतिबिंब संविधानात आहे. आपल्याला आपला हा समृद्ध वारसा कळेल तेव्हाच नियतीशी काय करार होता म्हणजे काय ते कळेल असं मत कवी आणि लेखक डॉ. श्रीरंजन आवटे यांनी मांडले. निमित्त होते लोकायत आयोजित नियतीशी करार: पंडित नेहरू आणि संविधान या व्याख्यानाचे. हे व्याख्यान १५ ऑगस्ट रोजी संध्या ६ वाजता नितु मांडके हॉल स्वारगेट येथे झाला.
पुढे ते म्हणाले की देश स्वतंत्र झाला तेव्हा प्रकाशाची वाट धुसर होती. ती वाट देशवासीयांना घेऊन पार करायची आहे, हा दृढनिश्चय मात्र नेहरूंजवळ होता. नियतीशी करार या नेहरूंच्या कल्पनेच्या पाया गांधीजींनी घातला आणि त्याला प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील म्हणाले की आजचा तरुण फक्त वर्तमानाचा विचार करतो आपल्या इतिहासाबाबत अनभिज्ञ आहे. संविधानातील घटनेचा उद्देश काय आहे? कर्तव्य काय आहेत? हक्क कुठले दिलेत? याबाबत प्रबोधन तरुणांमध्ये होणे गरजेचं आहे. प्रत्येकाचे जीवन अधिक समृध्द कसे होईल यासाठी नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टीकोनतून विचार कसा करावा हे आपल्याला शिकवलं.
यावेळी ‘आपण संविधान प्रेमी’ गटाच्या राज्यव्यापी अभियानाचं उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. श्रीरंजन आवटे, प्रमुख पाहुणे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.नलावडे, अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, लोकायतचे नीरज जैन, ज्ञानभारती प्रतिष्ठानचे अभय छाजेड, सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्या हस्ते झाले. राज्यव्यापी अभियानाची संकल्पना नीरज जैन यांनी सांगितली. उपस्थित सर्वांना संविधान प्रेमी अंतर्गत होऊ शकणाऱ्या विविध उपक्रमाबाबतचे साहित्य सर्वांना देण्यात आले.
सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले. कार्यक्रमाला तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान