May 11, 2024

पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी अभय छाजेड, सचिवपदी राजीव कुलकर्णी, खजिनदारपदी रोहित घाग यांची निवड

पुणे २९ नोव्हेंबर २०२३ – अभय छाजेड, राजीव कुलकर्णी, रोहित घाग यांची पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या अनुक्रमे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारपदी निवड करण्यात आली. ही नियुक्ती २०२३ ते २०२८ अशी पाच वर्षांसाठी असेल.

पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेची स्थापना १९७९ मध्ये करण्यात आली. जिल्ह्यातील अॅथलेटिक्स क्रीडा प्रकाराचा विकास करणे या उद्दिष्टाने संघटनेची स्थापना करण्यात आली होती. आजपर्यंत संघटनेने अनेक राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे.

पुणे जिल्ह्यातील खेळ आणि खेळाडूंच्या सर्वांगिण विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अडचणी आम्ही माननीय धर्मादाय आयुक्तांशी चर्चा करून पूर्ण सोडवल्या आहेत. त्यानंतर अॅथलेटिक्समधील अनुभवी व्यक्तींनी (शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय खेळाडू) एकत्र येऊन २३ सदस्यीय व्यवस्थापकीय समितीची स्थापना पुढील पाच वर्षांसाठी केली आहे. यामध्ये अविनाश बागवे, मनोहर येनकर, अशोक काळे, गुरबन्स कौर कामो, राघव अष्टकेर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे:

अध्यक्ष: अभय छाजेड

उपाध्यक्ष: मनोहर येनकर, अविनाश बागवे, अशोक काळे, गुरबन्स कौर कामो, राघव अष्टकेर

सचिव: राजीव कुलकर्णी;

खजिनदार: रोहित घाग;

सहसचिव: सुनील शेवाळे, विजयकुमार बेंगले, किशोरकुमार शिंदे, चंद्रकांत पाटील, सुधांशु खैरे;

कार्यकारिणी समिती: संगीता वाकचौरे, सुमंत वाईकर, रोहन मोरे, विश्वनाथ पाटोळे, हर्षदा दुबे, रेखा जोशी, रामदास कुदळे, अनिता कुदळे, शोभा निकम, सचिन आडेकर.