नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२६: अखिल भारतीय टेनिस संघटने(एआयटीए)च्या वतीने स्पर्धा व्यवस्थापनात क्रांती घडवून आणणाऱ्या एका नव्या स्वयंचलित प्रणालीची घोषणा करण्यात आली आहे. एआयटीएने नुकत्याच जाहीर केलेल्या योजनेनुसार या प्रणाली मध्ये टेनिस विश्वाला संपूर्णपणे नवी दिशा देणाऱ्या स्वयंचलित स्पर्धा व्यवस्थापन, संगणकीकृत मानांकन यादी आणि अनेक नव्या अभिनव सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंना स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणे, नाव मागे घेणे, विविध गटांसाठी नाव नोंदणी करणे आणि स्पर्धेतील सहभाग व वेळापत्रक निश्चित करणे अशा विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
या स्वयंचलित प्रणालीची घोषणा झाल्यानंतर अल्पावधीतच या व्यासपीठाला प्रचंड प्रतिसाद लाभला असून आधुनिक आणि स्वयंचलित संगणकीकृत प्रणालीद्वारे स्पर्धेत सहभाग निश्चित करण्यापासून, वेळापत्रक व मानांकन जाणून घेण्यापर्यंत सर्व काही जाणून घेण्यास खेळाडू अत्यंत उत्सुक असल्याचे सिद्ध झाले आहे. इतकेच नव्हे तर या स्वयंचलित प्रणालीमुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि स्पर्धा संयोजक यांना सातत्यपुर्ण आणि बिनचूक व्यवस्थापनाचा अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे.
पहिल्या टप्प्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे अखिल भारतीय टेनिस संघटने(एआयटीए)ने या प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यासाठीच्या डिजिटल मोबाईल ऍपचे अनावरण केंद्रीय क्रीडा सचिव हरिरंजन राव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी एआयटीएचे अध्यक्ष चिंतन पारीख, मानद सचिव सुंदर अय्यर, खजिनदार दिनेश अरोरा आदी उपस्थित होते. या ऍप द्वारे स्पर्धेसाठीचे स्वयंचलित(ऑटोमेटेड) ड्रॉ १० सप्टेंबर २०२६ रोजी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक व संयोजकांसाठी वेळेची बचत, पारदर्शकता आणि विना सायास मिळणारी माहिती असा तिहेरी फायदा होणार आहे.
एआयटीए प्लेयर ऍप
आणखी एका घोषणेनुसार एआयटीएने गुगल प्ले स्टोअर वर एआयटीए अँड्रॉइड प्लेयर ऍप उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. हे ऍप डाउनलोड करून खेळाडूंना त्याद्वारे स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि मानांकन, ड्रॉ समजू शकणार आहेत.
या ऍपचे ऍप्पल आयओएस वरील व्हर्जन सध्या प्रायोगिक स्थितीत असून ऍप्पल ऍप स्टोअरवर लवकरच उपलब्ध होईल. संगणकीकृत अनुभवासाठी मोबाईल ऍप हा महत्वाचा टप्पा असून खेळाडू व प्रशिक्षकांना बसल्याजागी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. आता पर्यंतच्या मानवी प्रक्रियेतील वेळ खाऊ पणा आणि चुका त्यामुळे टाळता येणार असून खेळाडूंना आपल्या हातातील मोबाईल वर स्पर्धेची माहिती, मानांकन आणि सर्व सेवा सुविधा एका स्वयंचलित प्रणालीवर उपलब्ध होणार आहे. परिणामी मनुष्यबळाची हि बचत होणार असून विनाकारण अनेक गोष्टींची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. तसेच, कार्यप्रणालीतील सातत्य आणि टेनिस समुदायासाठी सोईस्कर सुविधा असलेले व्यासपीठ याच बरोबर स्वयंचलित ड्रॉ मुळे स्पर्धा संयोजनातील सर्वात मोठी श्रम बचत होणार आहे.
या दोन्ही ऍपच्या घोषणेमुळे एआयटीएच्या इतिहासात एक नवा टप्पा गाठला गेला असून टेनिस पर्यावरण व्यवस्थेसाठी, स्पर्धा संयोजनासाठी, खेळाडूंना सोईस्कर अशा नव्या व्यवस्थापनाची निश्चित सुरुवात झाली आहे.

More Stories
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देव रुपारेलिया, लक्ष्या राजेश यांना अग्रमानांकन
तिसऱ्या पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत 58 खेळाडू सहभागी