पुणे, 02 सप्टेंबर 2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सायंकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एअर कमोडोर आणि एअर ऑफिसर कमांडिंग शेखर यादव, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धिरज सेठ, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी