पुणे, २२ जून २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गफूर पठाण यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मूक आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी हेल्मेट आणि चिलखत परिधान करून निषेध नोंदवत महापालिकेतील बिघडलेल्या वातावरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या काही नगरसेवकांवर सभागृहात दादागिरी आणि हिंसाचाराचे राजकारण केल्याचा आरोप केला. लोकशाहीच्या मंदिरात प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींवर हल्ले होत असतील, तर ही पुणेकरांसाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहात चर्चा आणि संवादाऐवजी धक्काबुक्की होत असल्याने लोकशाही मूल्यांना धक्का बसत असल्याचा आरोपही करण्यात आला.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, सभागृहातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत. लोकशाहीच्या रक्षणासाठी सभागृहात आणि रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

More Stories
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची बिनविरोध निवड
भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी सुरु;दर्शनाकरिता पास अनिवार्य-जिल्हा प्रशासनाची माहिती
आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले- गणेश बिडकर यांची घोषणा