पुणे, ४ एप्रिल २०२५ः गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांच्या मृत्यू झाला असून समाजात या घटनेमुळे लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने डॉ. सुश्रुत घैसास यांच्या रुग्णालयात दाखल होत तोडफोट केली आहे.
या प्रसंगी हर्षदा फरांदे , स्नेहल दगडे पाटील, पुनम चौधरी, आरती कोंढरे, उज्वला गौड आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला निवेदन देत या प्रकरणात लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले असून असे न झाल्यास पुढील कारवाईचा इशारा महिला आघाडीतर्फे देण्यात आला. हे निवेदन पत्र रुग्णालय प्रशासनातील अधिकारी रवी पालेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
याबाबत हर्षादा यांनी निवेदनात नमूद केले की, तनिषा भिसे यांना अत्यंत गंभीर अवस्थेत या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. परंतु अत्यंत असंवेदनशील व अमानवीय रीतीने हे प्रकरण हाताळत आपल्या हॅास्पिटल मधील डॉ. सुषृत घैसास आणि प्रशासकीय यंत्रणेने त्यांना केवळ पैसे पुर्ण भरले नाहीत म्हणून उपचार केले नाहीत व यामुळे सदर रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्धी रक्कम जमा करण्याची तयारी दाखवून आणि मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयातून निरोप येऊन देखील रुग्णावर कोणतेही उपचार करण्यात आले नसून ही बाब निंदनीय आहे. त्यामुळे भाजप महिला मोर्चा पुणे शहरातर्फे आमची मागणी आहे की डॉ. घैसास व प्रशासकीय कर्मचारी यांना त्वरित निलंबित करुन या प्रकरणी सखोल चौकशी करावी. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास भाजपा महिला मोर्चातर्फे या विरोधात आंदोलन करण्यात येईल व रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री व वैद्यकीय विभागकडे मागणी करण्यात येईल, असा ईशारा यावेळी देण्यात आला.

More Stories
डीजे बंदीवरून गणेश मंडळांचा गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची नमती भूमिका!
पश्चिम पुण्यासह शहराच्या विविध भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद
४० शाळांमधील ६३० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रतिकृती तयार करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली