पुणे, २१ नोव्हेंबर २०२५: पुणे ग्रॅंड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा २०२६ दरम्यान स्पर्धकांची सुरक्षितता आणि मार्गावरील डांबरीकरणाचे काम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ आणि शासनाच्या गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार 20 नोव्हेंबर 2025 ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत दररोज सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत संबंधित मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे:
मोरगाव ते मुर्टी रोड
या मार्गावर काम सुरू असताना वाहतूक:
मोरगाव – लोणीपाटी – लोणी भापकर – पेशवे वस्ती (कोऱ्हाळे बु) – करंजेपूल – सोमेश्वरनगर
मुर्ती ते चौधरवाडी फाटा रोड
काम सुरू असताना वाहतूक:
मुर्ती – वाकी – करंजे – सोमेश्वरनगर
चौधरवाडी फाटा ते निरा रोड
काम सुरू असताना वाहतूक:
चौधरवाडी फाटा – करंजे – सोमेश्वर
जिल्हादंडाधिकारी डूडी यांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेदरम्यान सुरळीत वाहतूक आणि सुरक्षिततेसाठी संबंधित विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सूचनाही देण्यात आल्या आहेत.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन