June 13, 2026

आज कॉक्रोज जनता पार्टी आपलं जाहीरनामा जाहीर करणार – अभिजित दिपके

पुणे, 11/06/2026: पुण्यात आज कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणात देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीने शिक्षण क्षेत्राबाबत तसेच देशात होत असलेल्या पेपर फुटी प्रकरणाबाबत पक्षाच्या वतीने जाहीरनामा आज जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी दिली.

पुण्यात आज कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्याने याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी अभिजित दिपके म्हणाला की आजच्या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण हे सहभागी होणार आहे.तसेच या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी तसेच कायदेअभ्यासक ॲड.असीम सरोदे आणि सोनम व्हाँगचुन्ग हे देखील सहभागी होणार आहे.शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही देशव्यापी आंदोलन करत आहोत आणि याची सुरुवात आज पुण्यापासून होत आहे.पुण्यात आंदोलन झाल्यानंतर लखनऊ,अमृतसर,जयपुर इथ आंदोलन करणार आहोत.जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर येत्या २० तारखेला पुन्हा एकदा दिल्लीत मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र येत आंदोलन करणार आहोत आणि या आंदोनात देशातील पेपर फुटी प्रकरणाबाबत शिक्षण क्षेत्रातील बदलाबाबत आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत अस यावेळी तो म्हणाला.

तो पुढे म्हणाला की आमच्या या मुमेंटला १५ दिवस झाले असून आम्ही शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नाच्या संदर्भात आवाज उठवणार आहोत.आम्हाला थोड वेळ दिल पाहिजे आणि आम्ही शिक्षणाबाबत संपूर्ण अभ्यास करून हा लढा लढणार आहोत.येत्या २० तारखेपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा नाही दिला तर आम्ही दिल्ली येथे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जो पर्यंत राजीनामा देत नाही तो पर्यंत हे आंदोलन असच सुरू राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.