पुणे, १७ जुलै २०२३: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ तसेच योजनेविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, कृषि उपसंचालक संजय विश्वासराव, उप विभागीय कृषि अधिकारी सूरज मडके, तंत्र अधिकारी रुपाली बंडगर आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी माहिती देणाऱ्या दोन प्रचाररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पीक विमा योजनेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. पहिल्या चित्ररथाचा मार्ग हवेली १७ व १८ जुलै, खेड १९ व २० जुलै, जुन्नर २१, २२ व २३ जुलै, आंबेगाव २४ व २५ जुलै, मावळ २६ व २७ जुलै, मुळशी २८, २९ व ३० जुलै तसेच दुसऱ्या चित्ररथाचा मार्ग शिरूर १७ व १८ जुलै, दौंड १९ व २० जुलै, बारामती २१ व २२ जुलै, इंदापूर २३ व २४ जुलै, पुरंदर २५ व २६ जुलै, भोर २७ व २८, वेल्हा २९ व ३० जुलै असा असणार आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.