पुणे, दि. १७ जुलै २०२३: वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क बसथांब्यानजिक लावलेला एक फ्लेक्स काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ केव्ही वाहिनीचा धक्का बसला व विद्युत अपघात झाल्याचे महावितरणच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले होते. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी दुपारी १.४५ वाजता घडली होती. दरम्यान विद्युत अपघातात जखमी झालेला अंकुश खंडू बनसोडे याचा रविवारी (दि. १६) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाने त्याचवेळी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी