पुणे, दि. २०/०८/२०२४: नैसर्गिक आपत्तीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पद्धतीने थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मदत वितरीत करण्यासाठी महाआयटीमार्फत संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे.
बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत माहे सप्टेंबर व ऑक्टोबर-२०२२, मार्च, एप्रिल व मे-२०२३, जून -२०२३, सप्टेंबर-२०२३ व नोव्हेंबर-२०२३ या कालावधीतील शेतपीक व शेतजमीन नुकसानीची रक्कम तसेच दुष्काळ निधी या प्रणालीमार्फत शासनस्तरावरुन पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरीत करण्यात आला आहे. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे हे पाहण्यासाठी https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus या संकेतस्थळावर माहिती घ्यावी, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान