पुणे, दि. 8/7/2026: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (८ जुलै) पहाटे ५.३० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग २२,८८० क्युसेकने वाढवून एकूण २७,२०३ क्युसेक करण्यात आला आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाने याबाबत सूचना जारी केली आहे. विभागाच्या माहितीनुसार, पावसाचा जोर आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात पुढील काळात वाढ किंवा घट केली जाऊ शकते.
प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे, वाहने किंवा इतर साहित्य असल्यास ते तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सतर्क करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन