May 12, 2024

40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकतेरिना मकारोवा हिला दुहेरी मुकुटाची संधी

नवी मुंबई, 30 डिसेंबर, 2023: नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली आणि गणेश नाईक यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत एकतेरिना मकारोवा हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
 

वाशी येथील गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत रशियाच्या अव्वल मानांकित एकतेरिना मकारोवा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत  सहाव्या मानांकित लात्वियाच्या डायना मार्सिचेविकाचा 6-3, 3-6, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या मानांकित जपानच्या मोयुका उचिजिमाने जपानच्या मिसाकी मत्सुदाचा

2-6, 6-3, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत अंतिम फेरीत लात्वियाच्या कॅमिला बारटन व रशियाच्या एकतेरिना मकारोवा यांनी जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा यांचा 6-3, 1-6, 10-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील दुहेरीत विजेत्या जोडीला 2230डॉलर व करंडक आणि उपविजेत्या जोडीला 1115 डॉलर व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि स्पर्धा संचालक डॉ. दिलीप राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
निकाल: मुख्य ड्रॉ:  उपांत्य  फेरी: एकेरी:
एकतेरिना मकारोवा(रशिया)[1] वि.वि. डायना मार्सिचेविका (लात्विया)[6]6-3, 3-6, 6-2;
मोयुका उचिजिमा(जपान)[2]वि.वि. मिसाकी मत्सुदा (जपान)2-6, 6-3, 6-2;
   
दुहेरी: अंतिम फेरी:
कॅमिला बारटन(लात्विया)/एकतेरिना मकारोवा(रशिया)वि.वि.फुना कोजाकी (जपान)/मिसाकी मात्सुदा(जपान)6-3, 1-6, 10-7.