पुणे, दि. ३१/१०/२०२४: भारत निवडणूक आयोगाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च पर्यवेक्षक उमेश कुमार यांनी पुणे महानगपालिकेच्या विठ्ठल तुपे नाट्यगृह, येथील निवडणूक कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे, जिल्हा समन्वय अधिकारी महेश सुधळकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले, श्रीमती शैलजा पाटील, अमोल पवार, तसेच सर्व विभागाचे नोडल अधिकारी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. कुमार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातील समन्वय अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत कामकाजाचा आढावा घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सर्व कक्षांची पाहणी केली. श्री. कुमार यांनी निवडणूक कार्यलयातील सर्व कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन करुन महत्वाच्या सूचना दिल्या.
More Stories
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी
पुणे: पालिकेचा दिवाळी बचत बाजार गजबजला – दोन दिवसांत १९ लाखांची विक्री
Pune: नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु