May 10, 2024

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सात मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

औंरंगाबाद, दि 31 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात शिवतेज शिरफ़ुले, फजल अली मीर, आदित्य आचार्य यांनी, तर मुलींच्या गटात धनश्री पाटील, त्वेशा नंदनकर, रिया गंगाम्मा पुडियोक्काडा, रिद्धी शिंदे यांनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकीत शिवतेज शिरफुलेने तिसऱ्या मानांकित प्रकाश सरनचा 5-7, 6-4, 6-3 असा तर, फजल अली मीरने सातव्या मानांकित दक्ष मुदुनुरीचा 6-3, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. आदित्य आचार्य याने आठव्या मानांकित शशांक साईप्रसाद कर्नाटकीवर 6-4, 6-0 असा विजय मिळवला.

मुलींच्या गटात त्वेशा नंदनकर हिने तिसऱ्या मानांकित दक्षिणाश्री एसआरचा 4-6, 6-0, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. चुरशीच्या लढतीत रिद्धी शिंदेने चौथ्या मानांकित मधुमिता रमेशचा 4-6, 6-3, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. धनश्री पाटीलने सहाव्या मानांकित मिश्का तायडेचा 6-0, 6-2 असा सहज पराभव केला. रिया गंगाम्मा पुडियोक्काडाने पाचव्या मानांकित पृथा रावचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला.

निकाल: एकेरी: मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी: मुख्य ड्रॉ:
हृतिक कटकम(भारत)[1]वि.वि.इशान खडीर(भारत) 6-1, 6-2;
अर्जुन वेलुरी (भारत)वि.वि.देवेंद्र कुलकर्णी (भारत)6-3, 6-2;
शिवतेज शिरफुले (भारत) वि.वि.प्रकाश सरन (भारत) [3] 5-7, 6-4, 6-3;
फजल अली मीर (भारत)वि.वि.दक्ष मुदुनुरी(भारत) [7]6-3, 6-3;
आदित्य आचार्य (भारत) वि.वि.शशांक साईप्रसाद कर्नाटकी(भारत) [8]6-4, 6-0;
निवेद पोनपा कोनेरा (भारत) [4]वि.वि.यशराज जरवाल(भारत) 6-3, 6-2;
क्रिशांक जोशी (भारत) वि.वि.कबीर जेटली(भारत)6-0, 6-0;
आयुश पुजारी(भारत)[2]वि.वि.साहिल कोठारी(भारत)6-0, 6-2;

मुली:
पार्थसारथी मुंढे (भारत)[1]वि.वि.काव्या देशमुख(भारत) 6-1, 6-1;
धनश्री पाटील (भारत)वि.वि.मिश्का तायडे (भारत)[6] 6-0, 6-2;
त्वेषा नंदनकर(भारत)वि.वि.दक्षिणाश्री एसआर(भारत)[3]4-6, 6-0, 6-0;
दिया अग्रवाल (भारत)वि.वि.ईश्वरी मार्कंडे (भारत)6-3, 6-2;
रिया गंगाम्मा पुडियोक्काडा (भारत)वि.वि.पृथा राव (भारत)[5] 6-0, 6-0;
रिद्धी शिंदे (भारत)वि.वि.मधुमिता रमेश(भारत) [4]4-6, 6-3, 6-3;
भक्ती ताजने(भारत)वि.वि.अनन्या यादव(भारत) 6-4, 6-1;
वृंदिका राजपूत(भारत)[2]वि.वि.मेहा पाटील(भारत) 6-2, 6-3