May 10, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत एमसीए अ संघाचा दुसरा विजय

पुणे, दि. 31 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत आयुश रक्ताडे 107 धावा व 2-23) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एमसीए अ संघाने विलास क्रिकेट क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदु जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या दोन दिवसीय लढतीत दुसऱ्यादिवशी एमसीए अ संघाच्या 27 षटकात 4बाद 178धावापासून खेळ पुढे सूरू झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात विलास क्रिकेट क्लब संघाने 62.5 षटकात सर्वबाद 222धावा केल्या. याच्या उत्तरात एमसीए अ संघाने 56.3 षटकात 9बाद 373 धावा काढून डाव घोषित केला. यात आयुश रक्ताडेने 63 चेंडूत 13चौकार व 5षटकारासह 107 धावांची शतकी खेळी केली. त्याला अभिनंदन गायकवाडने 78 चेंडूत 85 धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 106चेंडूत 158 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आफताफ शेख 70, पुष्कर अहिरराव 35(23,7×4), साहिल मदार 21 यांनी धावा काढल्या व संघाला पहिल्या डावात 151 धावांची आघाडीमिळवून दिली.
दुसऱ्या डावात राहुल वाजंत्री नाबाद 51(64,6×4,3×6), हरिओम काळे 33, हार्दिक मोटे 31, तुषार राठोड 28 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर विलास क्रिकेट क्लब : 49.5षटकात सर्वबाद 208धावा केल्या. विजयासाठी एमसीए अ संघाला 57 धावांची आवश्यकता होती. हे आव्हान एमसीए अ संघाने 6.4 षटकात 1बाद 58धावा करून पुर्ण केले. यात पुष्कर अहिरराव नाबाद 27, समेक जगताप 16, आयुश रक्ताडे नाबाद 14 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
निकाल:
पहिला डाव: विलास क्रिकेट क्लब: 62.5 षटकात सर्वबाद 222धावा वि. एमसीए अ: 56.3 षटकात 9बाद 373(डाव घोषित)(आयुश रक्ताडे 107(63, 13×4,5×6), अभिनंदन गायकवाड 85(78, 12×4), आफताफ शेख 70(57,9×4,2×6), पुष्कर अहिरराव 35(23,7×4), साहिल मदार 21, राहुल वाजंत्री 3-117, विराज आवळेकर 2-76); एमसीए अ संघाकडे पहिल्या डावात 151 धावांची आघाडी;
दुसरा डाव: विलास क्रिकेट क्लब : 49.5षटकात सर्वबाद 208धावा(राहुल वाजंत्री नाबाद 51(64,6×4,3×6), हरिओम काळे 33, हार्दिक मोटे 31, तुषार राठोड 28, साहिल मदार 2-20, आयुश रक्ताडे 2-23, आदिनाथ परभळकर 2-43) पराभुत वि.एमसीए अ: 6.4 षटकात 1बाद 58धावा(पुष्कर अहिरराव नाबाद 27(17,1×4,2×6), समेक जगताप 16, आयुश रक्ताडे नाबाद 14 , आदित्य लोखंडे 1-5); सामनावीर – आयुश रक्ताडे; एमसीए अ संघ 9 गडी राखून विजयी.