पुणे ३ मे २०२३ – अस्पायर इंडियाच्या वतीने आयोजित १२ वर्षांखालील ५एस बास्केटबॉल स्पर्धेत फझलानी आंतरराष्ट्रीय प्रशाला संघांच्या मुलींनी विजेतेपद मिळविले. या स्पर्धेचे आयोजन चिंचवड येथील दर्शन अकादामी सीबीएससी स्कूलने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्तविद्यमाने केले होते.
अंतिम सामन्यात फझलानी संघाने संघर्षपूर्ण लढतीत सिटी प्राईड अ संघाचा १०-८ असा पराभव केला. सोफिया शेखने विजयी संघाकडून सर्वाधिक ६ गुणांची कमाई केली. आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत मुलींच्या विभागातून सोफियाने सर्वाधिक १६ गुणांची नोंद केली. सिटी प्राईड संघाकडून राषी वायाळने ४, तर अथीवा अधिकारी आणि अहिल्या खुळेने प्रत्येक दोन गुणांची नोंद केली.
उपांत्य फेरीत फझलानी प्रशालेने एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलचा ८-२, तर सिटी प्राईड अ संघाने आपल्या ब संघाचा ६-० असा पराभव केला.
स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात पाच संघांनी सहभागी घेतला होता. यामध्ये विस्डम वर्ल्ड प्रशाला, सिटी प्राईड अ आणि ब, एल्प्रो आंतरराष्ट्रीय प्रशाला, फझलानी आंतरराष्ट्रीय प्रशाला अशा, तर मुलांच्या विभागात मुलींच्या गटातील संघांबरोबरच युरो आंतरराष्ट्रीय प्रशाला, सेंट उर्सुला प्रशाला, इन्फंट जीझस प्रशाला, एसएनबीपी अशा नऊ संघांचा सहभाग होता.
निकाल –
मुली – अंतिम सामना – फझलानी आंतरराष्ट्रीय प्रशाला १० (सोफिया शेख ६, अलिशा शेख २, अफिफा शेख २) वि.वि. सिटी प्राईड अ ८ (राशी वायाळ ४, अथिवा अधिकारी २, अहिल्या खुळे २)
तिसरा क्रमांक – सिटी प्राईड ब पुढे चाल वि. एल्प्रो आंतरराष्ट्रीय प्रशाला
उपांत्य फेरी – सिटी प्राईड अ ८ (राशी वाय़ाळ ४, अहिल्या खुळे २) वि. वि. सिटी प्राईड ब ०, फझलानी आंतरराष्ट्रीय प्रशाला मळवली ८ (सोफिया शेख ६, अलिशा शेख २) वि.वि. एल्प्रो आंतरराष्ट्रीय स्कूल २ (आर्या नायर २)
पहिली फेरी – सिटी प्राईड ब ९ (माही कळंबे ५, अर्निका पाटिल ४) वि.वि. एल्प्रो आंतरराष्ट्रीय स्कूल ०, फझलानी आंतरराष्ट्रीय स्कूल ८ (सोफिया शेख ४, अलिशा शेख २, अफ्रीन खान २) वि.वि. विस्डम आंतरराष्ट्रीय स्कूल २ (साईशा अरोरा १, निशिका गोयल), फझलानी आंतरराष्ट्रीय स्कूल २ (अलिशा शेख २) वि.वि. सिटी प्राईड अ ०, सिटी प्राईड अ १५ (राशी वायाळ ५, सात्विक सोनावणे ३, अथिवा अधिकारी २, अहिल्या खुळे ४, नंदिनी पात्रो २) वि.वि. विस्डम वर्ल्ड स्कूल ०
सर्वाधिक गुण – १) सोफिया शेख (फझलानी आंतरराष्ट्रीय स्कूल) १६, २) राशी वायाळ (सिटी प्राईड अ) १४ गुण
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील