December 14, 2024

पुण्यातील डीआरडीओ शास्त्रज्ञ अडकला पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये, व्हाट्सअपद्वारे पाकड्याना पुरवली गोपनीय माहिती

पुणे, दि. ०४/०५/२०२३: पुण्यातील डीआरडीओ शास्त्रज्ञाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानी हस्तकांनी गोपीनिय माहिती मिळवली आहे. संबंधित शास्त्रज्ञाने हिंदुस्तानशी गद्दारी करीत पदाचा गैरवापर केला आहे. सोशल मीडियाचा वापर करीत व्हाट्सएपद्वारे त्याने पाकिस्तानी हस्तकांना गोपनीय माहिती पुरवली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्हॉटअप व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉल करून शास्त्रज्ञाने पदाचा गैरवापर केला. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

 

प्रदीप कुरुलकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञाचे नाव आहे

 

दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील डीआरडीओ संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले प्रदीप कुरुलकर यांना काही दिवसापूर्वी फेसबुकवर महिलेचा फोटो असलेल्या आयडीवरून मेसेज आला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेचा डीपी असलेल्या व्यक्तीसोबत मेसेज सुरू केले. काही दिवस मेसेज देवाणघेवाण झाल्यानंतर कुरुलकरने व्हाट्सअप कॉलिंग द्वारे संपर्क सुरू केला.

 

डीआरडीओचे शास्त्रज्ञ असतानाही पदाचा गैरवापर करीत त्याने गोपनीय माहिती पाकिस्तानी हस्तकाला पाठवली. शासकीय कर्तव्य बजावित असताना हिंदुस्तानचा शत्रू राष्ट्रातील पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाला सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हॉटअपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉल केला. संवेदनशील शासकिय गुपिते शत्रु राष्ट्राला मिळाल्यास हिंदुस्तानच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो अशी माहिती असतानाही त्याने अनाधिकृतरित्या शत्रु राष्ट्रास माहिती पुरविली आहे.

 

याबाबत दहशतवाद विरोधी पथक ठाणे, काळाचौकी, मुंबई गु.र.न. ०२/२०२३ शासकीय गुपीते अधिनियम १९२३ कलम ०३ (१) (क), ०५(१)(अ), ०५(१) (क), ०५ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट करीत आहेत.