पुणे, २४/०४/२०२३: कोंढवा परिसरात पिसोळी येथे एका 65 वर्षीय व्यक्तीचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सकाळी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविचछेदनासाठी पाठवला आहे.
हाजीमुद्दीन बोराटे (वय- 62 ,रा पोसोळी,पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आंबेकर हॉटेल कात्रज बायपास रोड याठिकाणी हाजीमुद्दीन बोराटे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने फरशी मारून त्यांचा निर्घृण खून केलेला मृतदेह पोलिसांना मिळून आलेला आहे. याबाबत सदर परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे . या घटनेत कोणी प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आहे का याबाबतही पोलीस खात्यावर जमा करत आहे या संदर्भात पुढील तपास कोंढवा पोलीस ठाणे करत आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पाटील यांनी सांगितले की, मयत व्यक्तीस दारू पिण्याचे व्यसन होते .रविवारी रात्री घराबाहेर खुर्ची टाकून वॉकर घेऊन ते बसलेले होते .त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना बराच वेळ घरात बोलवत होते मात्र, ते घरात आलेले नव्हते त्यामुळे घरातील व्यक्ती झोपी गेले होत्या.दरम्यान, सोमवारी सकाळी हाजीमुद्दीन यांचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आलेला आहे. याप्रकरणी आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.
More Stories
पुणे: शहराच्या प्रवेशद्वारावर व्हीआयपी स्वच्छतागृह
.. तर पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
एम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी खुले