पुणे, १५ मे २०२४: पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये आबा बागुल मित्र परिवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची विजयी पोस्टर लावले आहेत. पुण्यातील मतदान संपल्यानंतर भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे खासदार म्हणून पोस्टर लावले होते.
त्यानंतर अमित बागुल यांनी सारसबाग परिसरामध्ये सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे यांना दणदणीत विजय केल्याबद्दल पोस्टर लावले आहेत. निकाल लागण्याआधीच भाजप आणि महाविकास आघाडीला पोस्टर लावण्याची घाई झाल्याचं यावरून दिसते. महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे उमेदवार मतदारांनी निर्धार करून मारला शिका, खासदार आमचा झाला पक्का, गुलाल आमचाच असा पोस्टरवर उल्लेख असणारा बॅनर सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेतोय.
पुण्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे .त्याचा फायदा कुणाला होणाऱ्या कडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
पुण्यातील भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांना आधीच विजय घोषित केल .

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही