पुणे, 15 फेब्रुवारी 2025: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 19व्या रमेश देसाई मेमोरियल राष्ट्रीय 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात हरियाणाच्या आराधना तेहलन हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या लक्ष्य त्रिपाठी याने विजेतेपद पटकावले.
जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या लक्ष्य त्रिपाठीने दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित नयन खत्रीचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 12 वर्षीय लक्ष्य हा बिर्ला ब्रेनीयास शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित हरियाणाच्या आराधना तेहलन हिने बाराव्या मानांकित महाराष्ट्राच्या त्रिशा भोसलेचा 6-2, 6-4 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. आराधना आरपीएस इंटरनॅशनल स्कुलमध्ये सातवी इयत्तेत शिकत आहे.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या जोडीला करंडक, प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, यस बँक लिमिटेडच्या इन्स्टिट्यूशनल बिझनेस, महाराष्ट्र व गोवा विभागाच्या मुख्य श्वेता गखर, यस बँक लिमिटेडच्या इन्स्टिट्यूशनल बिझनेस मुंबईच्या क्लस्टर हेड सीब्रता पाणीग्रही आणि यस बँक लिमिटेडच्या कुलाबा शाखेचे व्यवस्थापक अमित इंद्राळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी: मुली:
आराधना तेहलन(1)(हरियाणा)वि.वि.त्रिशा भोसले(12)(महा)6-2, 6-4;
मुले:
लक्ष्य त्रिपाठी (4)(महा)वि.वि.नयन खत्री(3)(दिल्ली) 6-1, 6-4.
More Stories
पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत दिग्विजय कडियन, महेश जगदाळे, पारस गुप्ता, विजय निचानी, लक्ष्मण रावत, हिमांशू जैन यांची आगेकूच
एमएसएलटीए अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरिज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हर्ष नागवानी, अहान जैन, अबीर सुखानी, मायरा शेख, सतेश्री नाईक, शौर्या पाटील, आस्मि पित्रे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत सोनू मातंगचा सनसनाटी विजय