May 20, 2024

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणाच्या तविश पहवा याला दुहेरी मुकुट

औंरंगाबाद, दि 28 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात हरियाणाच्या तविश पहवाने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.तर, मुलींच्या गटात तामिळनाडूच्या सविता भुवनेश्वरनने विजेतेपद पटकावले.
औंरंगाबाद येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर पार पडलेल्या एकेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या तविश पहवाने अव्वल मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकमचा 7-5, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तविश हा शिव नादर स्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत असून एक्सलेरेट टेनिस अकादमीत प्रशिक्षक टोड क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित सविता भुवनेश्वरनने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित पार्थसारथी मुंढेचा 4-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद मिळविले. सविता ही सेंट मेरिज मॅट्रिक गर्ल्स सेकंडरी हायस्कूल मध्ये दहावी इयत्तेत शिकत असून पेरीयार नगर टेनिस कोर्ट येथे प्रशिक्षक सर्वानन आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि एंड्युरन्स टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष संजय दत्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: अंतिम फेरी: मुले: तविश पहवा(हरियाणा)(2)वि.वि.हृतिक कटकम(तेलंगणा)(1)7-5, 6-3;
मुली: सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)(3)वि.वि.पार्थसारथी मुंढे (महा(7)4-6, 6-2, 6-3;