May 20, 2024

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढेचा सनसनाटी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश

औंरंगाबाद, दि 27 ऑक्टोबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात एकेरीत महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित पार्थसारथी मुंढेने ओडिशाच्या दुसऱ्या मानांकित आहानचा 4-6, 6-2, 6-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

औंरंगाबाद येथील ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्सवर सुरु असलेल्या एकेरीत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित तेलंगणाच्या हृतिक कटकमने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफुलेचा 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या तविश पहवाने कर्नाटकच्या चौथ्या मानांकित प्रकाश सरनचा टायब्रेकमध्ये 7-6(8),6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

मुलींच्या गटात तामिळनाडूच्या तिसऱ्या मानांकित सविता भुवनेश्वरनने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या हरियाणाच्या पाचव्या मानांकित आनंदिता उपाध्यायचा 7-5, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

दुहेरीत मुलांच्या गटात तेलंगणाच्या हृतिक कटकमने हरियाणाच्या तविश पाहवाच्या साथीत महाराष्ट्राच्या मनन अग्रवाल व गुजरातच्या ओम पटेल यांचा 6-4, 6-2 असा तर, तामिळनाडूच्या फजल अली मीर व कर्नाटकच्या प्रकाश सरन यांनी दिगंथ एम व अहान शेट्टी यांचा 7-5, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात कर्नाटकच्या सृष्टी किरण व तामिळनाडूच्या सविता भुवनेश्वरन यांनी आहान व पार्थसारथी मुंढे या अव्वल मानांकित जोडीचा 6-0, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हरियाणाच्या आनंदिता उपाध्याय व रीत अरोरा या जोडीने दीया अग्रवाल व वृंदिका राजपूतचा 6-1, 6-4 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: उपांत्य फेरी: मुले:
हृतिक कटकम(तेलंगणा)(1)वि.वि.शिवतेज शिरफुले(महा)(3)6-3, 6-4;
तविश पहवा(हरियाणा)(2)वि.वि.प्रकाश सरन(कर्नाटक)(4) 7-6(8),6-3;

मुली:
सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)(3)वि.वि.आनंदिता उपाध्याय (हरयाणा)(5)7-5, 6-3;
पार्थसारथी मुंढे (महा(7)वि.वि.आहान(ओडिशा)(2) 4-6, 6-2, 6-0;

दुहेरी: मुले: उपांत्य फेरी:
हृतिक कटकम(तेलंगणा)/तविश पाहवा(हरियाणा)(1)वि.वि.मनन अग्रवाल(महा)/ओम पटेल(गुजरात)6-4, 6-2;
फजल अली मीर (तामिळनाडू)/प्रकाश सररान(कर्नाटक)(2)वि.वि.दिगंथ एम(कर्नाटक)/अहान शेट्टी(महा)7-5, 6-3;

मुली:
सृष्टी किरण(कर्नाटक)/सविता भुवनेश्वरन(तामिळनाडू)वि.वि.आहान(ओडिशा)/पार्थसारथी मुंढे (महा)(1)6-0, 6-4;
आनंदिता उपाध्याय/रीत अरोरा(हरियाणा)(2)वि.वि.दीया अग्रवाल/वृंदिका राजपूत(महा)6-1, 6-4.