पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२५: एकूण महसूली गरज व प्रस्तावित वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महावितरण कंपनीने दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने गुरूवारी, दि. २७ फेब्रुवारीला पुणे येथील महाराष्ट्र शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (सीओइपी) मुख्य सभागृहात (ई-सुविधा केंद्रात) जाहीर ई-सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण कंपनी) आर्थिक वर्ष २०२२-२३ व आर्थिक वर्ष २०२३-२४ चे अंतिम अचूक समायोजन, आर्थिक वर्ष २०२४-२५ चे तात्पुरते समायोजन व आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० या पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी मा. महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर ही जाहीर ई-सुनावणी होणार आहे.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन