पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुना क्लबचे अध्यक्ष श्री सुनिल हांडा यांनी सांगितले की, स्पर्धेतील खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून संघांचे मालक हे क्लबचे सदस्य आहेत.
विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पुना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला जेट सिंथेसिस यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. देसाई ब्रदर्स लिमिटेड, एलिका, रुबी हॉल क्लीनिक, हिलयॉस, सुराणा ट्रेडर्स यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहेत. लिलावात रौनक ढोले पाटील, आरव वीज आणि किरण देशमुख हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.
स्पर्धेत जेट्स(राकेश नवनी), जीएम टायफून्स(आश्विन शहा व क्रिश शहा), क्वालिटी वॉरियर्स(आरव विज), मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोके), ओबेरॉय अँड निल किंग्ज(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), व्हीके टायगर्स(विक्
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेत प्रत्येक संघात एका सामन्यासाठी प्रत्येकी 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4.00 ते रात्री 10.00 या वेळेत होणार असून काही सामने विद्युताप्रकाश झोतात होणार आहेत.
स्पर्धेतील 12 संघांची 2 गटात प्रत्येकी 6संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. तसेच, या दोन्ही गटांतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार असून यातील अव्वल संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दि. 17 फेब्रुवारी 2024 या दिवशी होणार आहे. विजेत्या संघाला करंडक देण्यात येणार असून याशिवाय वैयक्तिक पारितोषिकेहि दिली जाणार आहेत.
याशिवाय महिला व क्लबच्या सदस्यांच्या लहान वयोगटासाठी देखील अंतिम फेरीच्या दिवशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. याबरोबरच सर्व खेळाडूंना व उपस्थितांना खेळाबरोबरच खाद्यपदार्थ, मनोरंजन याची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये गौरव गढोके(स्पर्धा अध्यक्ष), तुषार आसवानी, अमित रामनानी, ऋषी चैनानी व रणजित पांडे(स्पर्धा संचालक)यांचा समावेश आहे. कारा इन्टलेकट याच्या संकल्पनेतून व व्यवस्थापनेतुन ही स्पर्धा पार पडणार आहे.
More Stories
दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन उत्साहात संपन्न
पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या क्रीडा महोत्सवात रंगली स्केटींग व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा
एआयएफएफ एलिट युथ लीग फुटबॉल: स्पोर्ट्स मॅनियाचा सलग तिसरा विजय