September 14, 2024

दोन गटातून लॉयला, तर एका गटात बिशप्स प्रशाला विजेते

पुणे  २ ऑगस्ट २०२३ – यजमान लॉयला प्रशाला संघाने १४ आणि १६ वर्षांखालील गटातून लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र, त्यांना निर्भेळ यशापासून वंचित रहावे लागले. बिशप्स प्रशाला संघान १२ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले.
लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टाटा ऑटोकॉम्पने या स्पर्धेला आर्थिक पुरस्कार दिला होता.
१२ वर्षांखालील अंतिम सामन्यात बिशप्स प्रशाला संघाने लॉयला प्रशाला संघावर २-० असा विजय मिळविले.  हितांश खत्री आणि अबीर जाधवने सहा मिनिटांच्या अंतराने दोन्ही गोल नोंदवले.
१४ वर्षांखालील गटात लॉयला प्रशाला संघाने नियोजित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर शूट आऊटमध्ये ६-४ असा विजय मिळविला. सामन्यात रेहान जयपूरीने १८व्या मिनिटाला गोल करून बिशप्स प्रशाला संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर परम कलुकर्णीने ३८ आणि ४१व्या मिनिटाला गोल करून लॉयला प्रशालेस आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या भरपाई वेळेत ६३व्या मिनिटाला राजवीर सिंगने गोल करून बिशप्स प्रशालेला बरोबरी मिळवून दिली. शूट आऊटमध्ये लॉयलाकडून परम कुलकर्णी, आर्यवर्धन काकडे, पार्थ शिंदे आणि खरांशू गजरे यानी गोल केले. बिशप्सकडून केवळ जोशुहा सोंगाटे आणि आर्यवीर सिंग यांनाच गोल करता आला. रेहानची किक अडवली गेली, तर दिव्यान कौशिकची किक बाहेर गेली.
१६ वर्षांखालील गटातहबी लॉयला विजयासाठी झगडावे लागले. सात गोलच्या सामनायत लॉयला प्रशालेने बिशप्स प्रशालेवर ४-३ असा विजय मिळविला. बिशप्स प्रशाला संघाने १५व्या मिनिटाला आरिझ शेखच्या गोलने आघाडी घेतली, पण वेदांत कांबळेने ३९व्या मिनिटाला लॉयला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लव्या असरानीने ५३व्या आणि वेदांत गुप्ताने ५७व्या मिनिटाला गोल करून लॉयला प्रशालेला आघाडीवर नेले. मात्र, आरिझने ५४व्या मिनिटाला आणि अथर्व फडतरेने ५५व्या मिनिटाला गोल करून बिशप्स प्रशालेला बरोबरी साधून दिली. सामना ३-३ असा बरोबरीत सुटणार असे वाटत असताना ५८व्या मिनिटाला वेदांतने गोल करून लॉयलाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ टाटा मोटोकॉमने व्यवस्थापकीय संचालक अरविद गोएल यांच्या हस्ते पार पडला. या वेळी लॉयला प्रशालेचे मुख्याध्यापक फादर अनिष, माजी विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव हरित माथारु उपस्थित होते.
निकाल –
१२ वर्षांखालील – बिशप्स प्रशाला, कॅम्प २ ( हितांश खत्री ३८वे मिनिट, अबीर जाधव ४३वे मिनिट) वि.वि. लॉयला प्रशाला ०
१४ वर्षांखालील – लॉयला प्रशाला २ (४) (परम कुलकर्णी ३८, ४१वे मिनिट, परम कुलकर्णी, आर्यवर्धन काकडे, पार्थ शिंदे, खारांशु गजरे) वि.वि. बिशप्स प्रशाला, कॅम्प २ (२) (रेहान जयपूरी १८वे मिनिट, राजवीर सिंग ६०+३वे मिनिट, जोशुहा सोगांटे, आर्यवीर सिंग)
१६ वर्षांखालील – लॉयला प्रशाला ४ (वेदांत कांबळे ३९, ५८वे मिनिट, लव्या असरानी ५३वे मिनिट, वेदांत गुप्ता ५७वे मिनिट) वि.वि. बिशप्स प्रशाला, कॅम्प ३ (आरिझ शेख १५, ५४वे मिनिट, अथर्व फडतरे ५५वे मिनिट)