May 20, 2024

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात एमसीए ब संघाने अँबिशियसला 207धावात रोखले

पुणे, दि. 27 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत शिवराज शेळके 4-75) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एमसीए ब संघाने अँबिशियस क्रिकेट अकादमीला पहिल्या डावात 207धावात रोखले.

बारणे क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी एमसीए ब संघाच्या शिवराज शेळके 4-75, साईप्रसाद माने 3-35, यश बोरकर 2-20 यांनी केलेल्या शिस्तबध्द गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमीचा पहिला डाव 65.4षटकात सर्वबाद 207 धावावर संपुष्टात आला. वरच्या फळीतील फलंदाज पृथ्वी सिंग 11, शिव हरपाळे 11 हे झटपट बाद झाल्यामुळे 30.6षटकात 7बाद 82धावा असा अडचणीत सापडला. त्यानंतर रित्विक राडेने एकाबाजुने लढताना 164चेंडूत 10चौकार व 4 षटकाराच्या मदतीने 108धावांची शतकी खेळी केली. रित्विकने गौतम पुतगे(11धावा) च्या साथीत नवव्या गड्यासाठी 83चेंडूत 54 धावांची भागीदारी केली.

याच्या उत्तरात एमसीए ब संघाने आज दिवस अखेर 26 षटकात 1बाद 121धावा केल्या. यात आदित्य पाटीलने 58चेंडूत 7चौकार व 2षटकाराच्या मदतीने 57 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर करण वाघमोडेने 83चेंडूत 10चौकार नाबाद 56 धावा, शर्विन किसवे नाबाद 6वर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

निकाल:
अँबिशियस क्रिकेट अकादमी: 65.4षटकात सर्वबाद 207 धावा(रित्विक राडे 108(164,10×4,4×6), गौतम पुतगे 11, पृथ्वी सिंग 11, शिव हरपाळे 11, शिवराज शेळके 4-75, साईप्रसाद माने 3-35, यश बोरकर 2-20) वि. एमसीए ब: 26 षटकात 1बाद 121धावा(करण वाघमोडे नाबाद 56(83,10×4), आदित्य पाटील 57(58,7×4,2×6), शर्विन किसवे नाबाद 6, नीरज जोशी 1-50);