पुणे, २९/०२/२०२४: पुणे शहरात मेट्रोचे जाळे उभे राहत आहे. मात्र, पुणे विमानतळाला मेट्रोची लाईन जोडण्यात आलेली नाही, प्रवाशांच्या सोईसाठी ही मेट्रो विमानतळापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत 293 व्या ठराव्यावरील चर्चेत आमदार टिंगरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, शहरात मेट्रोचे जाळे अतिशय मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतोय. या मेट्रोने शिवाजीनगर, पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन, स्वारगेट एसटी स्टॅन्ड असे महत्वाचे भाग जोडले आहेत. मात्र, शहरात विमानतळ आहे याचा विसर पडलेला दिसतो. नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत ही मेट्रो आलेली आहे. मात्र, ती विमानतळाला जोडलेली नाही, त्यामुळे विमानतळावर ये-जा करणार्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. आपण परदेशात विमानतळापासून थेट मेट्रोची सुविधा पाहतो. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोईसाठी पुणे विमानतळापर्यंत मेट्रो नेण्यात यावी अशी मागणी आमदार टिंगरे यांनी सरकारकडे केली.

More Stories
पुणेकर कलारसिकांना होणार देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन
नवीन पुनर्विकास शासन निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता येणार – सुहास पटवर्धन
पाणी कपातीमुळे २.३० टीएमसी पाण्याची बचत, दुष्काळात ३७ दिवसाचा पाणीसाठा उपयोगी