पुणे, १६ फेब्रुवारी २०२६ः पादचाऱ्यांना सुरक्षित, समतल आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका पथ विभागाने विशेष पटपथ दुरुस्ती अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ सोमवारी (दि. १६) प्रभाग १२ मधील लकाकी रोड पदपथ दुरुस्तीकरून करण्यात आला.
या अभियानाअंतर्गत फुटपाथवरील विद्युत खांब, फलक, डीपी बॉक्स आदी अडथळे पदपथाच्या कडेला हलविण्यात येणार असून पादचाऱ्यांसाठी फुटपाथ समतल व सुस्थितीत करण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांना सुरक्षित आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शिवाजीनगर परिसरातील लकाकी रोड तसेच थोरात चौक ते वेताळबाबा चौक हे दोन रस्ते प्राधान्याने हाती घेण्यात आले आहेत. सुमारे १४०० मीटर लांबीच्या या रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या विद्यमान पदपथांची योग्य प्रकारे दुरुस्ती करून ते आदर्शरित्या विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर त्याच धर्तीवर संपूर्ण पुणे शहरात विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या प्रसंगी महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते.

More Stories
पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून : विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना आनंद घेता येणार
Pune: फेरीवाल्यांना नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ
भीम फेस्टिवल २०२६ : बावधनमध्ये उत्साहात साजरी आंबेडकर जयंती