पुणे, ७ ऑगस्ट २०२५ : कोंढवा खुर्दमधील जे. के. पार्कजवळ उभारण्यात आलेल्या ८ मजली अनधिकृत इमारतीवर आज पुणे महानगरपालिकेच्या विशेष पथकाने जोरदार कारवाई केली. सुमारे ५००० चौरस फुटांचे पार्किंग आणि आरसीसी स्वरूपाचे पूर्ण इमारतीचे बांधकाम पाडण्यात आले.
महापालिकेच्या विशेष पथकात १० बिगारी, ५ पोलीस कर्मचारी, १ जेसीबी, ४ ब्रेकर, २ गॅस कट्टर, ४ कनिष्ठ अभियंते आणि २ उपअभियंते सहभागी होते. ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, सदर इमारत ही संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे नागरिकांनी या इमारतीत वास्तव्य करू नये तसेच कोणतीही सदनिका खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी मोहिमेचा भाग असून, पुणेकरांनी अशा प्रकल्पांपासून सावध राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

More Stories
व्यवसायात मूल्यांचे निर्विवाद महत्त्व : रमेश अग्रवाल
Pune: पथारी व्यावसायिकांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव
शिवरायांचा अपमान; सरकार गप्प! बागेश्वर बाबाविरोधैत काॅंग्रेसचे आंदोलन