April 28, 2024

पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रमुख

पुणे ता. ८/०६/२०२३: भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी आज जाहीर केली. यामध्ये पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.

महाविकास आघाडी तर्फे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणे सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई, पुणे येथे बैठका झालेल्या आहेत. आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची एकत्रित बैठक होऊन जागावाटप यावर चर्चा होणार आहे. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपची शिंदे गटासोबत युती असणार आहे. त्यांचे अद्याप चर्चा सुरू झाली नसती तरी भाजपने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी आज जाहीर करून निवडणुकीची जबाबदारी निश्चित केली आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिकामी आहे. तेथे पोटनिवडणूक होणार की नाही यावर अद्याप स्पष्टता नाही. पण ही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी बापट यांच्या कुटुंबातील स्वरदा बापट यांचे नाव चर्चेत आहे. तसेच मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, धीरज घाटे, मेधा कुलकर्णी हे देखील इच्छुक आहेत.

गेल्याच आठवड्यात प्रदेश उपाध्याय अमर साबळे यांची पुणे लोसकभेचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता पार्श्वभूमीवर आज मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.
शहरातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख निश्चित करताना तेथील माजी आमदार किंवा निवडणूक लढवलेले उमेदवार, विधानसभा अध्यक्षांकडे जबाबदारी दिलेली आहे.

वडगाव शेरी मतदारसंघाची जबाबदारी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवाजीनगर दत्ता खाडे, खडकवासला सचिन मोरे, कसबा मतदारसंघ हेमंत रासने, कोथरूड पुनीत जोशी, हडपसर माजी आमदार योगेश टिळेकर, पर्वती जितेंद्र पोळेकर, पुणे कॅन्टोन्मेंट अजिंक्य वाळेकर यांची नियुक्ती केली आहे.