October 14, 2024

पुणे: सायबर चोरट्यांचा डॉक्टर महिलेला २३ लाखांचा गंडा

पुणे, दि. २४/०४/२०२३:  सोशल मीडियावरील जाहिरातीलंना लाईक्स मिळवून दिल्यास पैसे देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी  डॉक्टर महिलेला २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल आहे.  याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ५० वर्षीय डॉक्टर महिलेने  फिर्याद दिली आहे.

तक्रारदार डॉक्टर महिला शिवाजीनगर भागात राहायला आहे. आरोपींनी डॉक्टर महिलेला फेसबुकद्वारे संदेश पाठविला होता. सोशल मीडियावरील जाहिरातीच्या व्हिडिओंना दर्शक पसंती मिळवून (लाइक्स) दिल्यास पैशांचे असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी महिलेला ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले होते. सुरुवातीला डॉक्टर महिलेला काही रक्कम भरण्यास सांगण्यात आले.    त्यांना वेळोवेळी आमिष दाखवून त्यांच्याकडून २३ लाख ८३ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार दिली.  पोलीस निरीक्षक विक्रम गौड तपास करत आहेत.